मानखुर्द स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब ओव्हरहेड वायरवर पडला, त्यामुळे हार्बर मार्गही ठप्प झाला आहे. ठाण्यात रुळांवर पाणी साठल्याने कल्याणच्या  दिशेने जाणारी वाहतूकही ठप्प झाली आहे. त्यामुळे घर गाठणाऱ्या चाकरमान्यांचेही हाल होत आहेत.

शुक्रवारपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये चांगलाच पाऊस पडतो आहे. त्याचा परिणाम तिन्ही मार्गावरच्या वाहतुकीवर झाला आहे. सकाळी ट्रेन्स १५ ते २० मिनिटं उशीर झाला होता. आता मानखुर्द पुलाचा स्लॅब ओव्हरहेड वायरवर पडल्याने हार्बर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं आणि पुलावरचा ढिगारा काढण्याचं काम सुरु आहे.