वाहनचालकांचा धोकादायक पुलांवरून प्रवास सुरूच

मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या भायखळा पुलासह एकू ण सहा ब्रिटिशकालीन पुलांऐवजी के बल स्टेड पूल बांधण्याच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. महाराष्ट्र रेल इन्फ्रोस्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेडकडून (एमआरआयडीसी) प्रथम टिळक पूल व रे रोड उड्डाणपुलांचे काम हाती घेतले जाणार आहे. परंतु हे कामही सध्या कागदोपत्रीच आहे. त्यामुळे मुंबई शहरातील धोकादायक झालेल्या ब्रिटिशकालीन पुलांवरून आणखी काही वर्षे वाहनचालकांना प्रवास करावा लागणार आहे.

शंभरी ओलांडलेल्या उड्डाणपुलांच्या पुनर्बाधणीचे काम एमआरआयडीसीकडून के ले जात असून त्यासाठी मुंबई पालिके चे सहकार्य मिळत आहे. एकू ण ११ ब्रिटिशकालीन पुलांच्या पुनर्बाधणी काम एमआरआयडीसी करणार आहे. त्यात प्रथम सहा पुलांच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई पालिके च्या अर्थसंकल्पात फक्त रे रोड व टिळक पुलालाच प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अन्य चार पुलांसाठी परवानगी न मिळाल्याने त्या पुलांचे काम लांबणीवर पडले आहे. या सर्व पुलांचे सर्वेक्षणही पूर्ण झाले असून त्याचा अंदाजित खर्चही काढून तो पालिके कडे पाठवण्यात आला. सहा पूल हे के बल स्टेड पद्धतीने उभारले जाणार आहेत. यातील टिळक उड्डाणपुलासाठी ३५० कोटी रुपये आणि रे रोड उड्डाणपुलासाठी १४२ कोटी रुपयांचा खर्च आहे. हे दोन्ही पूल दोन ते तीन वर्षांत उभारले जाणार आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांपासून या पुलांच्या उभारणीची चर्चाच सुरू आहे. या संदर्भात एमआरआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैस्वाल यांनी एकूण ११ उड्डाणपुलांचे काम हाती घेतले आहे. त्या सगळ्या पुलांच्या कामांना गती दिली जात असून असून त्यासाठी मुंबई पालिके कडून सहकार्य मिळत आहे.

पूल उभारणीसाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे सांगितले. मार्च २०२० पासून करोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यामुळेही काम काहीसे रखडले.

शंभरी ओलांडलेले पूल

माझगावमधील ओलिव्हेंट उड्डाणपूल, भायखळा उड्डाणपूल, दादरमधील टिळक पूल, मुंबई सेंट्रल येथील बेलासिस उड्डाणपूल, रे रोड उड्डाणपूल आणि आर्थर रोड उड्डाणपूल हे दक्षिण मुंबईतील महत्त्वाचे पण शंभरी ओलांडलेले पूल आहेत. यापैकी ओलिव्हेंट हा सर्वात म्हणजे १३४ वर्षे जुना पूल आहे. रे रोड पूल १९२० मध्ये, तर टिळक पूल १९२५ मध्ये उभारण्यात आला आहे.