News Flash

खड्डय़ात पडून चिमुकलीचा मृत्यू

या घटनेमुळे गोरेगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

गोरेगाव येथील ऑबेरॉय मॉल जवळ ‘मेट्रो’चे काम सुरू असलेल्या ठिकाणी खड्डय़ात पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेमुळे गोरेगाव परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

गोरेगाव (पूर्व) येथील ऑबेरॉय मॉलजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. रविवारी रात्री २०.२५ च्या सुमारास शीतल किरण मिश्रा ही तीन वर्षांची चिमुकली तेथून जात होती. त्यावेळी तेथील खड्डय़ात पडली. तात्काळ शीतलला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र शीतलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागाकडून मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 12:17 am

Web Title: small girl death pot hole
Next Stories
1 तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
2 आंघोळ करणाऱ्या महिलेला चोरुन पाहणं आजोबांना पडलं महागात
3 धक्कादायक! पॉर्नच्या आहारी गेलेल्या १४ वर्षाच्या मुलाने १६ वर्षाच्या बहिणीवर केला बलात्कार
Just Now!
X