लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : टाळेबंदीमुळे घरकोंडीत राहून आलेला ताण घालवण्यासाठी एक छोटेखानी नाटय़ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नाटय़ चळवळीचे प्रवर्तक अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे संमेलन माटुंग्याच्या दादर-माटुंगा सांस्कृतिक कें द्रात ८ डिसेंबरला दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत निमंत्रितांच्या उपस्थितीत होईल.

‘मालिका यासुद्धा नाटय़प्रकारातच मोडतात. टाळेबंदीत नाटके  बंद असताना त्यांची उणीव मालिकांनी भरून काढली’, या भावनेतून मालिकांच्या लेखकांनाही या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अशोक मुळ्ये यांनी निवडक ६० नाटककोरांना संमेलनात सहभागी करून घेतले आहे. सुरेश खरे, रवींद्र पेम, प्रसाद कांबळी हेही संमेलनाला उपस्थित असतील. संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष यांची नावे संमेलनाच्या सुरुवातीला जाहीर के ली जातील. रंगभूमीसंदर्भातील कोणतीही गंभीर चर्चा व करोनाबाबतची चर्चा येथे होणार नाही.

सुरुवातीचा एक तास चहापान, गप्पा आणि दुपारी ३ ते संध्याकाळी ५ संमेलन होईल. या वेळी दोन तरुण व्यक्तींचा सन्मान के ला जाणार आहे. संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत मराठी-हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम होईल.

संगीत संयोजन प्रशांत ललित यांचे असून के तकी भावे, नीलिमा गोखले, श्रीरंग भावे आणि जयंत पिंगुळकर हे गायक कलाकार असणार आहेत. रवींद्र आवटी हे सभागृहाचे प्रायोजक आहेत. दामोदर सभागृह कॅ ण्टीनच्या सीमा वैद्य श्रीखंड पुरी आणि मसालेभात असे जेवण पुरवणार आहेत. जेवण पंगत पद्धतीने होईल.