06 August 2020

News Flash

ज्येष्ठ नागरिकांना एसटीत ‘स्मार्ट कार्ड’

या ‘स्मार्ट कार्ड’ला आधारकार्डची जोडही असणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या पासात सतत बनावट पास आढळून आल्याने एसटी महामंडळाकडून येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे. या ‘स्मार्ट कार्ड’ला आधारकार्डची जोडही असणार आहे. त्यामुळे बनावट पासवर सवलती लाटणाऱ्या प्रकाराला आळा बसणार असल्याचा दावा एसटीचे अधिकारी करत आहेत.
राज्यभरात एसटीच्या १८ हजारांहून अधिक बसगाडय़ा सोडण्यात येतात. यातून सुमारे ६० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात १५ ते २० टक्के ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र अनेक प्रवासी या सवलतीसाठी बनावट ओळखपत्र बनवत आहेत. वेळोवेळी कारवाई करूनही बनावट ओळखपत्रे वाढतच असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.

महादेवन, खरे यांचाही समावेश
अभिनयातील पदार्पणासाठी गश्मीर महाजनी (कॅ री ऑन मराठा), शंकर महादेवन (कटय़ार काळजात घुसली) आणि संदीप खरे (बायोस्कोप) यांना तर अभिनेत्रीसाठी मुग्धा चाफेकर (दी सायलेन्स), ऊर्मिला निंबाळकर (एक तारा) आणि मिताली मयेकर (उर्फी) यांना नामांकने जाहीर झाली आहेत. तर चित्रपट निर्मितीतील पदार्पणासाठी नवनीत हतुलड (दी सायलेन्स), लक्ष्मण कागणे (हलाल) आणि सचिन आडसूळ, नितीन आडसूळ यांना नामांकन आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 2:19 am

Web Title: smart card for senior citizen in st
टॅग St
Next Stories
1 अनावर जयंती जल्लोष..
2 छगन भुजबळ यांच्या कंपनीचा संचालकच माफीचा साक्षीदार?
3 ‘नालायकांचे सोबती’ या अग्रलेखावर व्यक्त व्हा!
Just Now!
X