पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मुंबई सेंट्रल या स्टेशनवरील रेल्वे कारखान्यात उभ्या असलेल्या जयपूर एक्स्प्रेसच्या एसी कोचला आग लागली. बुधवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही आग नियंत्रणात आणली गेली आहे. जयपूर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12955) च्या एसी 3 टायर डब्याला आग लागली. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली त्याचा शोध घेतला जात असल्याचं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कारखान्यात उभ्या असलेल्या जयपूर एक्स्प्रेसच्या एसी 3 टायरच्या डब्याला आग लागली. आग लागताच या आगीवर काही वेळाने नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र आगीचे कारण नेमके काय ते समजू शकलेले नाही. त्याचा तपास सुरु आहे असंही पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे.

12955 या क्रमांकाच्या जयपूर एक्स्प्रेसच्या एसी थ्री टायरच्या डब्यातून धूर येऊ लागला. त्यामुळे तातडीने आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली आणि ही आग नियंत्रणात आणली. ट्रेनची वेळ बदलण्यात आली. एक्स्प्रेसचा जळालेला डबा बदलून रात्री 8.50 ही एक्स्प्रेस रवाना करण्यात आली असंही पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे.