ब्राझिलहून मुंबईत आलेल्या एक प्रवाशाने पोटातून एक किलो कोकेन  दडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. हवाई गुप्तचर विभागाने या प्रवाशाला अटक केली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घाना देशाचा नागरिक असलेला एक प्रवासी कोकेनची घेऊन मुंबई येणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावर सापळा लावला. दुपारी साडेबाराच्या सुमारास  ईके ५०४ क्रमांकाच्या विमानातून आलेल्या या प्रवाशाला पथकाने ताब्यात घेतले. त्याने पोटात कॅप्सुलमध्ये १ किलो कोकेन दडवलेले होते. ते बाहेर काढण्यासाठी त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती हवाई गुप्तचर विभागचे सहाय्याक पोलीस आयुक्त मिलींद लांजेवार यांनी दिली.
एकजरी कॅप्सूल फुटली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. या एक किलो कोकेनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात पाच कोटी रुपये आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही.