अ‍ॅडॉल्फ हिटलर यांच्या आत्मचरित्रात दडवून दक्षिण भारतातून मुंबईत आलेल्या एलएसडी या पार्टी ड्रगचा साठा अंमलीपदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) जप्त केला. एलएसडीचा मोठा साठा युरोपीय देशांतून दक्षिण भारतात चोर वाटेने आला होता. तेथून तो मागणीनुसार मुंबईसह अन्य शहरांत कुरिअरद्वारे पाठवण्यात आला, अशी माहिती एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टपाल तिकिटाच्या आकाराच्या एका एलएसडी डॉट किंवा एलएसडी पेपरची किंमत भारतात तीन ते चार हजार रुपये इतकी आहे. जप्त केलेले एलएसडी पेपर उच्चप्रतिचे आहेत. हे एलएसडी पेपर हिटलर यांच्या आत्मचरित्रात दडवून दक्षिण भारतातून मुंबईत पाठविण्यात आले. त्याबाबतची  माहिती मिळताच विलेपार्लेतील कु रिअर कं पनीतून हे आत्मचरित्र पथकाने ताब्यात घेतले.  आत्मचरित्र पाठवणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या व्यक्तींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले.

परळ गावात सापळा रचत एनसीबीने गणेश शेरे, सिद्धांत अमीन या दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून पथकाने ३१० ग्रॅम परदेशी गांजा (बड) जप्त केला.