छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ तसेच सोन्याची तस्करी करू पाहणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. यांपैकी एका नायजेरियन नागरिक आह़े  या दोन घटनांमध्ये सुमारे सात कोटी रुपयांचा ऐवजही हस्तगत करण्यात आला.सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून, इथिओपियन एअरलाइन्सने रविवारी पहाटे आलेल्या उकेग्बू ओनवुका ओकपन याच्या सामानांची झडती घेतली असता त्याच्याकडे सात कोटी रुपये किमतीचा अ‍ॅम्पिटामाईन हा सात किलो वजनाचा अमली पदार्थ आढळला. तर दुसऱ्या घटनेत, दुबईहून इंडिगो एअरलाइन्सने आलेल्या अम्माक्कोठ सफीर या प्रवाशाकडून ४६ लाख किमतीची १६ सोन्याची बिस्किटे हस्तगत करण्यात आली. एका स्पीकरमध्ये ही बिस्किटे लपविण्यात आली होती. केरळातील मित्राने हे स्पीकर दिले. मात्र त्यात काय होते हे आपल्याला माहिती नव्हते, असे त्याने म्हणणे होते.