News Flash

ठाणे : धावत्या लोकलमध्ये आढळला साप, प्रवाशांमध्ये गोंधळ

सीएसएमटीकडे जाणारी ही लोकल ठाणे स्थानकावर पोहोचली तोपर्यंत कोणाचं लक्ष नव्हतं. पण नंतर...

(व्हिडीओचा स्क्रिनशॉट)

टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये साप आढळल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे लोकलमधल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळाचं वातावरण झालं होतं.

टिटवाळ्याहून ८ वाजून ३३ मिनिटांनी सीएसएमटी लोकल निघाली. लोकल ठाणे स्थानकावर पोहोचली तोपर्यंत कोणाचं लक्ष नव्हतं. पण नंतर एका प्रवाशाचं लोकलमधल्या फॅनकडे लक्ष गेलं आणि त्याने आरडाओरड करत फॅनमध्ये साप असल्याचं इतरांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

थोड्यावेळात एका प्रवाशाने लाकडी पट्टीच्या सहाय्याने सापाला खाली पाडलं आणि लोकलमधून खाली रुळांवर ढकलून दिलं. त्यानंतर लोकल पुढे मार्गस्थ झाली. या गोंधळामुळे काही वेळासाठी लोकल थांबवण्यात आली होती, त्यामुळे त्या लोकलच्या मागच्याही काही लोकल थांबवण्यात आल्या होत्या.

पाहा व्हिडीओ –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 11:44 am

Web Title: snake found in mumbai local at thane station
Next Stories
1 बेकायदा बांगलादेशींचा शोध घेण्यासाठी मुंबईतही एनआरसी लागू करा: राज पुरोहित
2 लोकलमधल्या ‘त्या’ टवाळखोर स्टंटबाजांना शोधलं, पोलिसांनी घातल्या बेड्या
3 महापालिका म्हणते, हे खड्डे नाहीत.!
Just Now!
X