News Flash

व्हिवा लाऊंजमध्ये स्नेहा खानवलकर!

‘गँग्ज ऑफ वासेपूर’ भाग १ व २ या चित्रपटाइतकीच त्यातील गाणीही वेगळी ठरली. या आगळ्यावेगळ्या आणि कथानुरुप गाण्यांची संगीतकार स्नेहा खानवलकर २३ जानेवारीला व्हिवा लाऊंजच्या

| January 22, 2013 03:29 am

‘गँग्ज ऑफ वासेपूर’ भाग १ व २ या चित्रपटाइतकीच त्यातील गाणीही वेगळी ठरली. या आगळ्यावेगळ्या आणि कथानुरुप गाण्यांची संगीतकार स्नेहा खानवलकर २३ जानेवारीला व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस येत आहे. स्नेहाचे ‘ओ वुमनिया’, ‘कह के लुंगा’ ही गाणी सर्वाच्याच तोंडी आहेत. या गाण्यांच्या जन्मकथा आणि ही गाणी तयार करतानाचे अनुभव यावेळी तिच्याकडून जाणून घेता येतील.
‘तिच्या विजयासाठी’ अशी टॅगलाइन असलेला व्हिवा लाऊंज हा कार्यक्रम अल्पावधीत सर्वाच्या पसंतीस उतरला आहे. व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून आतापर्यंत अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नेमबाज अंजली भागवत, खासदार सुप्रिया सुळे, आघाडीची गायिका बेला शेंडे, आरजे मलिष्का, डॉ. रश्मी करंदीकर, दिग्दर्शिका गौरी शिंदे, पटकथा लेखिका ऊर्मी जुवेकर अशा मान्यवर महिलांशी संवाद साधण्यात आला आहे.
स्त्री संगीतकार म्हटले की उषा खन्ना यांचे नाव चटकन आठवते. मात्र हा अपवादच ठरावा. स्नेहा आज या क्षेत्रात स्वतला सिद्ध करू पाहते आहे. लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत या दोहोंचा मिलाफ करून स्नेहाने अनेक नवी गाणी आपल्यासमोर आणली आहेत. तिच्या याच संगीतमय प्रवासाविषयी वाचकांना अधिक जाणून घेता येणार
आहे.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिराच्या पु. ल. देशपांडे मिनी थिएटरमध्ये २३ जानेवारी या दिवशी दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार असून तो सर्वाना खुला  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:29 am

Web Title: sneha khanvilkar is in viva lounge
टॅग : Loksatta,Viva
Next Stories
1 ‘एलिव्हेटेड रेल्वे’ला आकार येतोय!
2 नियम धाब्यावर बसविणाऱ्या प्राचार्याविरोधात तक्रार
3 आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून पालिका शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग
Just Now!
X