News Flash

…म्हणून कडक निर्बंध आपण लागू करत आहोत – बाळासाहेब थोरात

लॉकडाउन कुणालाच नको आहे, असं देखील सांगितलं आहे.

संग्रहीत

राज्यातील करोना संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळात आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने करोनाबाधितांची संख्या वाढत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत काही कडक निर्णय घेण्यात असून, त्यानुसार राज्यात आता शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. तर अन्य दिवशी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “लॉकडाउन तर आपल्याला टाळायचा आहे आणि जर लॉकडाउन टाळायचा असेल तर काही कडक निर्बंध पाळावे लागणार आहेत. आठवड्याच्या शेवट्या दोन दिवसात लोकं मोठ्याप्रमाणावर बाहेर येत असतात, एकत्र येतात, काही कार्यक्रम देखील मोठ्याप्रमाणावर असतात याचा परिणामा संसर्ग वाढण्यावर होत असतो. त्यामुळे हे आठवड्याचे शेवटचे दोन दिवस लॉकडाउनसारखे निर्बंध कडक केले जावेत, अशी आमची चर्चा झालेली आहे, अखेर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील.”

तसेच, “लॉकडाउन कोणालाच नको आहे, कारण लॉकडाउनमध्ये गरिबांचे खूप हाल झाले. त्यांचा रोजगार गेला, त्यांचं उत्पन्नाचं साधन गेलं. व्यापारी, कारखानदारांचं देखील मोठं नुकसान झालं. अर्थव्यवस्था अडचणीत आली. लॉकडाउनचे दुष्परिणाम देखील खूपच मोठे असतात, हे नाकारता येणार नाही म्हणून कडक निर्बंध आपण लागू करत आहोत. त्यामध्ये जर आपण संसर्ग रोखू शकलो तर शेवटचा पर्याय जो आहे तो लॉकडाउन आपण टाळू शकतो. परंतु शेवटचा पर्याय हा लॉकडाउन असतो हे देखील आपल्याला विसरून चालत नाही.” असं देखील थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

ठरलं! महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन

याचबरोबर “संकट तर खूप मोठं आहे, मानवतेवरील संकट आहे. महाराष्ट्रात याचं प्रमाण जास्त आहे, का जास्त आहे? हे आम्ही आज सांगू शकत नाही. मागील वेळी देखील आपण हे संकट अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. रूग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु दुर्दैवाने आम्ही बेफिकीर झालो आणि प्रादुर्भाव आता वाढू लागला आहे. याला सामोरं जाण्याची तयारी आम्ही आता करतो आहोत. सर्व नागरिकांचा आरोग्य विभाग, पोलीस विभाग व अन्य विभाग यांचा सर्वांचा सहभाग  महत्वाचा असतो. महसूल विभागाची जिल्ह्याची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांवर असते, आमचा महसूल विभाग आज जे लसीकरण सुरू आहे, त्यात काम करतो आहे आणि जिथं जबाबदारी मिळेल तिथे त्याचं काम निश्चित चांगलं राहणार आहे.” असं देखील यावेळी थोरात यांनी बोलून दाखवलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 7:13 pm

Web Title: so we are imposing strict restrictions balasaheb thorat msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबईत रात्री अत्यावश्यक सेवानांच परवानगी; पालकमंत्री शेख यांची माहिती
2 सनटेक इमारतीजवळील भाग खचला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3 मुंबईकरानो, आजही लसीकरण सुरू; BMCनं केलं आवाहन
Just Now!
X