दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात नुकतीच घडली. माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकल्याचं समोर आलं आहे. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ”ठाकरे सरकार परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही?” असा प्रश्न केला आहे.
जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे.
”जर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीची अटक होऊ शकते. तर एस टी चे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी बेशरम ठाकरे सरकार परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही जबाबदार धरावे. असं भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.
आणखी वाचा- माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार; बस कंडक्टरने घेतला गळफास
तसेच, दिवाळी उत्सवात महापालिका आणि पोलिसांनी लादलेल्या जाचक अटी पाहता ‘हिंदूना कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे’ असे ‘सेक्युलर’ धोरण ठाकरे सरकारने अंगिकारलेले दिसत आहे. अशी देखील टीका भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
दिवाळी उत्सवात महापालिका आणि पोलिसांनी लादलेल्या जाचक अटी पाहता ‘हिंदूना कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे’ असे ‘सेक्युलर’ धोरण
ठाकरे सरकारने अंगिकारलेले दिसते आहे… @OfficeofUT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 9, 2020
दरम्यान, करोना महामारीमुळे ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे एसटी कर्चचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्व एसटी कर्मचारी चिंतेत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज चौधरीच्या आत्महत्येमुळे जळगाव शहरात आणि एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 9, 2020 3:35 pm