पश्चिम रेल्वेच्या १५ स्थानकांवर भ्रमणध्वनी चार्ज करण्याकरिता सौर चार्जर लावण्यात आले आहेत. हे चार्जिग यंत्र संपूर्ण नैसर्गिक  स्रोतांवर आधारलेले आहे.

फनसोलर फाउंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हे यंत्र शंभर टक्के पर्यावरणपूरक  असल्याचा दावा रेल्वेने के ला आहे. दररोज लाखो लोक  रेल्वेने प्रवास क रत असतात. त्यामुळे प्रवाशांची चार्जिगची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही यंत्रे बसवण्यात आली आहेत. विजेऐवजी सौर ऊ र्जेचा वापर क रून यात भ्रमणध्वनी चार्ज होईल. ही सेवा मोफत असून एको यंत्रावर एकोवेळी आठ फोन तर दिवसभरात साधारण शंभर भ्रमणध्वनी चार्ज होऊ  शक तात. या यंत्रांसाठी लागणारे सौर पॅनल स्थानकोंच्या वरच्या बाजूस बसवण्यात आले आहे. चर्चगेट, ग्रांट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, दादर, सांताक्रु झ, अंधरी (प), कोंदिवली (प), बोरिवली (पू), बोरिवली (प), वसई रोड (प), नालासोपारा (प), विरार, बोईसर, पालघर अशा पंधरा स्थानकोंवर हे यंत्र बसवण्यात आले आहेत.