मध्य रेल्वेची वाहतूक आज जवळपास  १५ मिनिटं उशिराने सुरू असल्याने  प्रवासी चांगलेच वैतागले आहेत. नेरळजवळ दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं लोकलची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.

अंबरनाथकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू आहे, मात्र बदलापूरच्या पुढे हा बिघाड असल्याने सीएसटीकडे जाणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.   कर्जत व मुंबईकडे जाणा-या रेल्वे उशीराने धाव आहेत.