News Flash

कामत यांच्या दिल्लीत भेटीगाठी

राजकीय संन्यासाची घोषणा करणाऱ्या गुरुदास कामत यांची समजूत काढण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून सुरू झाले आहेत.

Gurudas Kamat : गेल्या काही काळापासून गुरूदास कामत सातत्याने पक्षनेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.

राजकीय संन्यासाची घोषणा करणाऱ्या गुरुदास कामत यांची समजूत काढण्याचे प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून सुरू झाले आहेत. दिल्लीत कामत यांनी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. कामत बुधवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची कामत यांनी भेट घेतली. पटेल यांच्या सुनेच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्याकरिता ही भेट घेतल्याचे सांगण्यात आले. ए. के. अ‍ॅन्टोनी यांचीही कामत यांनी भेट घेतली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही कामत भेट घेणार आहेत. या भेटीबाबत काहीही बोलण्यास कामत यांनी नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 2:45 am

Web Title: sonia gandhi meets gurudas kamat
टॅग : Gurudas Kamat
Next Stories
1 डॉ. लहाने यांना जे.जे.मधून हटविले!
2 पनवेलमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे चिंतन
3 राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई
Just Now!
X