News Flash

लवकरच राणीच्या बागेचे आभासी पर्यटन

काही महिन्यांपूर्वी ‘द मुंबई झू’ नावाने बागेचे ऑनलाइन व्यासपीठ निर्माण करण्यात आले

मुंबई : पेंग्विनची दुडदडी चाल, धडकी भरवणारी बिबट्याची डरकाळी, चपळाईने पळणारी हरणे, असे प्राणिजगत लवकरच ऑनलाइन अनुभवता येणार आहे. ‘द मुंबई झू’ या ऑनलाइन व्यासपीठावर लवकरच राणीच्या बागेचे आभासी पर्यटन (व्हर्च्युअल टूर) सुरू होणार आहे. त्याची एक झलक (ट्रेलर) शनिवारी सकाळी १० वाजता महापौरांच्या हस्ते प्रसिद्ध झाली.  .

भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात  टाळेबंदीमुळे गेले दीड वर्ष मुंबईकरांना  पाऊल टाकता आलेले नाही. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ‘द मुंबई झू’ नावाने बागेचे ऑनलाइन व्यासपीठ निर्माण करण्यात आले. ‘द मुंबई झू’च्या माध्यमातून दिनविशेषांनुसार विविध व्याख्याने आयोजित के ली जात आहेत. तसेच बागेतील प्राणी-पक्ष्यांची थोडक्यात सचित्र माहिती दिली जात आहे. याचेच पुढील पाऊल म्हणून सुरू होणाऱ्या आभासी पर्यटनात अधिकाधिक माहिती दृकश्राव्य फितींद्वारे दिली जाईल.

शनिवारी प्रसिद्ध झालेली झलक पाहताना त्यात राणीच्या बागेतील हिरवाईसोबतच तेथील जैविक संपदेचे वैविध्य अनुभवता येत आहे. जगभरातील ७ पैकी ६ खंडांतील झाडे राणीच्या बागेत आहेत. दुर्मीळ भारतीय वनस्पतीही आहेत. तसेच १ अस्वल, १ बारशिंगा, २ वाघ, २ तरस, २ बिबटे, ४ कोल्हे, ४ पाणगेंडे, ५ पेंग्विन, ४० हरणे, विविध प्रकारचे कोळी, फु लपाखरांसारखे कीटक, पक्षी आहेत. हे सर्व वन्यवैभव प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवता येईल.

कसे जाल?

https://instagram.com/themumbaizoo?utm_medium=copy_link

https://www.youtube.com/channel/UC_wJpYS5VTN9TvYCOrD0okQ

https://www.facebook.com/TheMumbaiZoo

Twitter: https://twitter.com/TheMumbaiZoo

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 1:47 am

Web Title: soon a virtual tour of the rani baug queen garden akp 94
Next Stories
1 करोना रुग्णसंख्येत ३३ टक्क्यांनी घट
2 ८६६ नवे बाधित, २९ मृत्यू
3 ‘ल्युडो’ हा खेळ  कौशल्याचा की नशिबाचा?
Just Now!
X