22 September 2020

News Flash

काळ कसोटीचा आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा विचार करु नये : अनिल बोंडे

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात १९,००० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

अनिल बोंडे, कृषीमंत्री

राजस्थान आणि मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पीक कर्जमाफीपेक्षा महाराष्ट्रात पीक कर्जमाफीची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे. दरम्यान, येत्या काही आठवड्यांत उर्वरीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करु नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.


बोंडे म्हणाले, मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आत्महत्येचे विचार मनातून काढून टाकावेत. सध्याचा काळ कसोटीचा आहे कारण, अद्याप राज्यात पावसाने हजेरी लावलेली नाही. या परिस्थितीशी आपल्या सर्वांना लढा द्यायचा आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी चांगले काम करीत आहे. काँग्रेसचे सरकार असलेल्या आणि मोठा गाजावाजा झालेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीपेक्षा आपल्याकडे कर्जमाफीची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे, अशा राजकीय शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

राज्यात सध्या कृषी संकट निर्माण झाले आहे ही खरी बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १९,००० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. मात्र, उर्वरीत शेतकऱ्यांना येत्या काही आठवड्यांमध्ये कर्जमाफीचा फायदा मिळेल असे आश्वासन त्यांनी यावेळी देले.

दरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वचनाची पुर्तता सरकार करणार असून आजपर्यंत ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनाचा फायदा मिळाला आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांना खात्री देतो की सरकार त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्यांचा विचार करु नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 12:57 pm

Web Title: soon farmers will get relief of loan waiver they should not try to suicide says agri minister anil bonde aau 85
Next Stories
1 काँग्रेससारख्या विरोधकांना शवासनाची गरज-शिवसेना
2 रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
3 मंत्र्याच्या भगिनीला आंदोलन करण्यास पोलिसांचा मज्जाव
Just Now!
X