News Flash

पश्चिम रेल्वेवरील बम्बार्डियर लोकलच्या वेगात लवकरच वाढ

नवीन वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होणार असून, प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील बम्बार्डियर लोकलच्या वेगात लवकरच वाढ
(संग्रहित छायाचित्र)

 

पश्चिम रेल्वेवर नव्याने धावत असलेल्या बम्बार्डियर लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतितास ७० किलोमीटरवरून प्रतितास ९० किलोमीटर वेगाने या गाडय़ा धावणार आहेत. नवीन वर्षांपासून त्याची अंमलबजावणी होणार असून, प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर ‘मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-२’अंतर्गत अधिक आरामदायी आणि हवेशीर असलेल्या बम्बार्डियर लोकल धावत असून त्याला प्रवाशांनी पसंती दिली आहे. पश्चिम रेल्वेवर नवीन ६३ बम्बार्डियर लोकल कार्यरत असून त्यांची कमाल क्षमता प्रतितास ११० किलोमीटर इतकी आहे. मात्र, जलद मार्गावर या लोकलचा वेग प्रतितास ८० ते १०० किमी असून धिम्या मार्गावर मात्र प्रतितास ७० किलोमीटर आहे. नव्या वर्षांपासून बम्बार्डियर लोकलचा वेग हा मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली स्थानकादरम्यान ७० ऐवजी प्रतितास ९० एवढा असेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

बम्बार्डियरचा वेग सुमारे ९० किमी प्रतितास  केला जाणार असल्याने प्रत्येक लोकल फेरीचा वेग प्रतितास २० किलोमीटर इतका वाढणार आहे. त्यामुळे बोरीवली पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 1:31 am

Web Title: soon to be the speed of the bombardier locality on the western railway abn 97
Next Stories
1 सूर्यग्रहणावर मळभ!
2 मंत्रिमंडळ शपथविधी दुपारी दोनच्या आत!
3 कर्जमाफीची व्याप्ती पुर्वीच्या सरकारपेक्षा कमी?
Just Now!
X