News Flash

दक्षिण मुंबईत येत्या बुधवारी पाणी बंद

ए, बी, व ई विभागातील परिसरांतील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भंडारवाडा जलकुंभाचा अभ्यास व तपासणी करण्याचे काम पालिकेने हाती घेतल्यामुळे येत्या बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ए, बी, व ई विभागातील परिसरांतील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

पाणी कपातीदरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. भंडारवाडा जलकुंभाच्या तपासणीच्या कामानंतर काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता पालिकेने व्यक्त केली आहे.

बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी ‘ए’  विभागात  नेव्हल डॉकयार्डमध्ये , ‘बी’ विभाग  पी. डिमेलो रोड, संत तुकाराम रोड, फ्लँक रोड, केशवजी नाईक रोड, बी. पी. टी. या विभागात पाणीपुरवठा होणार नाही. तर ‘ई’ विभाग  बी. पी. टी., मोदी कंपाऊंड, डी. एन. सिंग रोड, हुसेन पटेल रोड, रामचंद्र भट्ट मार्ग, ई. एस. पाटणवाला मार्ग, मोतीशहा लेन, डॉ. मस्करहॅन्स रोड, रामभाऊ भोगले मार्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, टी. बी. कदम मार्ग, डॉकयार्ड रोड, गनपावडर रोड, कारपेंटर रोड, नवाब टँक रोड, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, जे. जे. रुग्णालय येथे पुरवठा बंद राहील.

गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी ‘बी’ विभाग – डोंगरी रोड, युसुफ मेहेरअली रोड, जकारीया मस्जिद रोड, मेमनवाडा रोड, मोहम्मद अली रोड, कांबेकर रोड, झंजीकर रोड, शेरीफ देवजी रोड, अब्दुल रेहमान रोड, पायधुनी येथे पाणीपुरवठा होणार नाही. ‘ई’ विभाग  मदनपुरा, ना. म. जोशी रोड, क्लेअर रोड, साखळी रोड, मौलाना आझाद रोड, दत्तारामभाऊ  कोयंडे रोड, बीआयटी ताडवाडी, सेठ मोतीशाह मार्ग , जे. जे. रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. तर ‘ई’ विभागात डॉ. आनंदराव नायर रोड, मोटलीबाई रोड, आग्रीपाडा चाळ, मेघराज शेट्टी रोड, जहांगिर बोमन बेहराम रोड, साने गुरुजी रोड, गेल रोड, मौलाना आझाद रोड, नायर रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:58 am

Web Title: south mumbai no water supply akp 94
Next Stories
1 हॉटेल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला
2 लोकमान्य टिळक टर्मिनसवर ‘प्रीपेड’ रिक्षा सेवा
3 शिक्षिकेच्या हत्येमागील हेतूबाबतचे गूढ कायम
Just Now!
X