करोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता संपूर्ण मुंबईभर पालिकेने निर्जतुकीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून पालिके ने कस्तुरबा रुग्णालय आणि आर्थर रोड तुरुंग परिसरात विशेष निर्जतुकीकरण मोहीम हाती घेतली होती. हा परिसर सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील झाल्यामुळे पालिके च्या जी दक्षिण विभागाने या परिसरात औषधाची फवारणी के ली.

करोनाबाधित किंवा संशयित रुग्णांना रुग्णवाहिकेतून कस्तुरबामध्येच विशेषत: आणले जाते. तसेच याच परिसरात पालिके च्या रुग्णवाहिकांचे गॅरेजही आहे. समोरच मुंबईतला प्रसिद्ध आर्थर रोड तुरुंग आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. या परिसरात विषाणूचा फै लाव होऊ नये म्हणून पालिके ने निर्जतुकीकरण मोहीम हाती घेतली आहे.

या परिसरातील बसस्टॉप, प्रवेशद्वारे, रुग्णालयाच्या आवारातील रस्ते, जिने, बाके, गाडय़ा अशा सर्वच ठिकाणी ही फवारणी करण्यात येत होती.  जिथे हात लागू शकतो अशा सर्व ठिकाणी औषधांची फवारणी के ली जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

करोनाची साथ तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र औषध फवारणी के ल्यामुळे करोनाची साथ पूर्णपणे मिटणार नाही, त्याकरीता लोकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

फक्त कुठे विषाणू स्थिरावला असेल तर तो या फवारणीमुळे मरतो. मात्र त्यानंतर पुन्हा एखादा विषाणू तिथे जमा झाल्यास त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी घरातच थांबणे, नको शक्यतो बाहेर कुठल्याही वस्तूला स्पर्श न करणे, हात वारंवार धुणे ही काळजी घेतलीच पाहिजे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

धूर फवारणीचा उपयोग नाही

दरम्यान, या काळात अनेक ठिकाणाहून नागरिक धूर फवारणी करण्याची मागणी करीत आहेत. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर धूर फवारणीला मर्यादा येत आहेत. धूर फवारल्यास विषाणू मरतील, असे लोकांना वाटते. मात्र करोनाच्या आजारात श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो, प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे करोनाचा रुग्ण किंवा एखादा विलगीकरण करायला सांगितलेला रुग्ण असेल अशांना त्याचा उलट त्रास होऊ शकतो, असेही मत त्यांनी मांडले आहे. परंतु, या काळातही हिवताप आणि डेंग्यूचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून त्या औषधांचीही फवारणी आम्ही करीत आहोत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.