फिल्म्स डिव्हिजनतर्फे  ‘सत्यार्थी’ माहितीपटाचे आज प्रसारण

मुंबई : जागतिक बालकामगारविरोधी दिनाचे औचित्य साधून फिल्म्स डिव्हिजनच्या वतीने उद्या १२ जून रोजी ‘सत्यार्थी’ हा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. नोबेल विजेते आणि बालहक्क चळवळीचे कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी बालमजुरी उच्चाटनासाठी के लेले कार्य, त्यांचे योगदान यावर आधारित या माहितीपटाचे दिग्दर्शन पंकज जोहर यांनी के ले आहे. हा माहितीपट फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

‘बालमजुरी संपवण्यासाठी आत्ताच कृती करा’ ही यंदाच्या जागतिक बालकामगार दिनाची संकल्पना आहे. या संकल्पनेमागचा उद्देश लक्षात घेत बालहक्कांसाठी जगभर प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या कै लाश सत्यार्थी यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारा हा माहितीपट फिल्म्स डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि यूटय़ूब वाहिनीवरही पाहता येणार आहे. बालमजुरी उच्चाटनासाठी सत्यार्थी १९९० पासून कार्यरत आहेत. ‘बचपन बचाओ आंदोलन’ या त्यांच्या संस्थेंतर्गत ते कार्यरत असून आजवर त्यांनी ८० हजार मुलांची बालमजुरीतून सुटका के ली आहे. पंकज जोहर दिग्दर्शित ‘सत्यार्थी’ या माहितीपटात कै लाश सत्यार्थी यांच्या या कार्याचे चित्रण केले आहे. ज्या मुलांची त्यांनी बालमजुरीतून सुटका के ली, त्यांच्या कथा या माहितीपटात पाहायला मिळणार आहेत.

सत्यार्थी आणि त्यांचे सहकारी कशापद्धतीने प्रसंगी लोकांचे शिव्याशाप खाऊन, हल्ले अंगावर झेलून मुलांची बालमजुरीतून सुटका करतात याचे चित्रण या माहितीपटात करण्यात आले आहे. हा माहितीपट फिल्म्स डिव्हिजनच्या संके तस्थळावर ‘डॉक्युमेंट्री ऑफ द वीक’ या विभागात पाहण्यासाठी उपलब्ध आहे, तसेच यूटय़ूबवरूनही हा माहितीपट पाहता येईल.