X

आज मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक

मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री उशिरा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

उद्या पश्चिम, हार्बर मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री उशिरा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कधी:  शनिवार, ७ ऑक्टोबर, रात्री ११-४० ते रविवारी पहाटे ५-१०पर्यंत

कुठे: स्टॅडहर्स्ट रोड ते करी रोड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर

परिणाम:  शनिवारी रात्री ११-३० ते रविवारी पहाटे पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाडय़ा सीएसटी ते परळदरम्यान जलद मार्गावरून चालविल्या जातील. तर शनिवारी रात्री परळ येथे ११.१८ ते रविवारी पहाटे ५.०९ पर्यंतच्या सर्व अप धिम्या मार्गावरील गाडय़ा अप जलद मार्गावरून धावणार आहेत. यामुळे या गाडय़ांना मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड येथे गाडय़ा थांबणार नाहीत. रात्री ११.२५ आणि ११.४८ वाजता सीएसटीहून कुर्ला येथे जाणाऱ्या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तर ११.३९ची ठाणे लोकलही रद्द करण्यात आली आहे. अप मार्गावर रात्री ९.५९ वाजता डोंबिवलीहून सीएसटीला येणारी गाडी कुल्र्यापर्यंतच चालविली जाणार आहे.

पश्चिम रेल्वे, हार्बर मार्ग

कधी : रविवार, ८ ऑक्टोबर, सकाळी १०-३५ ते दुपारी ३-३५

कुठे: अंधेरी ते माहीम अप आणि डाऊन मार्गावर

परिणाम:  या कालावधीतील हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.

  • Tags: railway-mega-block,
  • Outbrain