26 September 2020

News Flash

कळवा-ठाणे दरम्यान उद्या रात्री विशेष ब्लॉक

ठाणे येथील रेल्वे यार्डाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार-गुरुवारच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला असून कळवा आणि ठाणे दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

| December 19, 2012 06:56 am

ठाणे येथील रेल्वे यार्डाच्या दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार-गुरुवारच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला असून कळवा आणि ठाणे दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
बुधवार-गुरवारच्या मध्यरात्री १२.५० ते सकाळी ४.५० या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या मार्गावर हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसहून ठाण्याकडे जाणारी १२.२५ वाजताची ठाणे गाडी तसेच ठाण्याहून सकाळी ४.४४ वाजताची गाडी रद्द करण्यात आली आहे. तर कर्जत, अंबरनाथ आणि टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या गाडय़ा जलद मार्गावरून वळविण्यात आल्या असून त्या मुंब्रा आणि कळवा येथे थांबणार नसल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 6:56 am

Web Title: special mega block on tomorrow night between kalwa thane
टॅग Mega Block,Railway
Next Stories
1 सिंचन क्षेत्राची चौकशी होणार की ‘जलसंपदा’तील गैरव्यवहारांची?
2 शाहीन धाडावरील गुन्हे मागे
3 पोलीस उपनिरीक्षकाला भर रस्त्यात मारहाण
Just Now!
X