कल्याणमध्ये मध्य रेल्वेकडून उद्या (दि.१८) रेल्वेमार्गावरील ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडण्यात येणार आहे. हे काम सुमारे ६ तास (सकाळी ९.३० ते दुपारी ३.३०) चालणार असल्याने या काळात मध्य रेल्वे मार्गावरील सेवा काही काळापुरती बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल तर काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहा कुठल्या गाड्यांच्या वेळापत्रकावर काय परिणाम होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रद्द झालेल्या गाड्या –

१) 12117/12118 अप-डाउन लो. टिळक टर्मिनस-मनमाड-लो. टिळक टर्मिनस एक्सप्रेस

२) 51154 अप भुसावळ-मुंबई पॅसेंजर

३) १९ तारखेला निघणारी 51153 डाउन मुंबई- भुसावळ पॅसेंजर

४) 22101/22012 अप–डाउन मुंबई-मनमाड-मुंबई राज्यरानी एक्सप्रेस

५) 12072/12071 अप–डाउन जालना–दादर जनशताब्दी एक्सप्रेस

६) 12110/12109 अप-डाउन-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसवेळा

बदलण्यात आलेल्या गाड्या – 

१) 11071 लो. टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेस 12.40 ला सुटणारी गाडी 15-00 वाजता सुटणार

२) 12869 मुंबई-हावड़ा एक्सप्रेस 11.05 वाजता सुटणारी गाडी 15.00 वाजता सुटेल.

३) 12141 लो. टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र एक्सप्रेस 23.35 वाजता सुटणारी गाडी मध्यरात्री 2.00 सुटेल.

४) 02598 मुंबई-गोरखपुर विशेष ही 14.20 ला सुटणारी गाडी 18.45 वाजता सुटेल.

५) 12322 मुंबई-हावड़ा मेल 21.30 ला सुटणारी गाडी मध्यरात्री 01.00 वाजता सुटेल.

६) 19 नोव्हेंबरला सुटणारी 11093 मुंबई वाराणसी महानगरी एक्सप्रेस मध्यरात्री 00.10 वाजता सुटणारी गाड़ी मध्य रात्री 02..00 वाजता सुटणार

७) 19 नोव्हेंबरला सुटणारी 12167 लो. टिळक टर्मिनस वाराणसी एक्सप्रेस मध्य रात्री 00-35  सुटणारी गाड़ी रात्री 02-30 वाजता सुटणार.

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन – 

१) 17 नोव्हेंबर रोजी निघणारी 12140 नागपुर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस 18 नोव्हेंबर रोजी नाशिक रोड स्टेशनवर शॉर्ट टर्मिनेट करणार.

२) 12139 मुंबई-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक रोड स्टेशनमधून निघणार.

मार्ग बदललेल्या गाड्या –

१) भुसावळ स्टेशनवरुन निघणारी 12321 हावडा-मुंबई मेल व्हाया जळगांव-वसई रोड-दिवा मार्गे जाणार. ही गाडी भिवंडी रोड आणि दिवा स्टेशनवर थांबेल.

२) भुसावळ स्टेशनवरुन निघणारी 13201 राजेंद्र नगर पाटणा लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस वाया जळगांव-वसई रोड-दिवा येथून जाणार नाही. तसेच भिवंडी रोड आणि दिवा स्टेशनवर थांबेल.

३) भुसावळ स्टेशनवरुन निघणारी 12168 वाराणसी-लो. टिळक टर्मिनस एक्सप्रेस व्हाया जळगांव-वसई रोड-दिव्यावरुन जाणारी गाडी असेल. भिवंडी रोड आणि दिवा स्टेशनवर थांबेल.

४) 11055 लो. टिळक टर्मिनस–गोरखपुर एक्सप्रेस व्हाया दिवा वसई–जळगाव ही गाडी दिवा आणि भिवंडी रोड स्टेशनवर थांबेल.

५) 11061 लो. टिळक टर्मिनस–दरभंगा पवन एक्सप्रेस व्हाया दिवा-वसई–जळगाव अशी जाऊन भिवंडी रोड स्टेशन वर थांबेल.

६) 11026 पुणे-भुसावळ-हुतात्मा एक्सप्रेस व्हाया मनमाड-दौंड-कल्याणहून भुसावळला येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special mega block tomorrow for patri bridge demolition work see which trains are canceled
First published on: 17-11-2018 at 04:10 IST