करोना निर्बंधांमुळे महिला कर्मचारी वर्गाची प्रवास दगदग टाळण्यासाठी सोमवारपासून (२१ सप्टेंबर) गर्दीच्या वेळेत विशेष एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

शासकीय सेवेतील महिलांबरोबरच खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी शुक्रवारी सांगितले.

पनवेल, डोंबिवली, विरार येथून मंत्रालयापर्यंत या एसटी बस सोडण्यात येतील. प्रत्येक ठिकाणाहून सकाळी एक एसटी बस सुटेल. मंत्रालय येथून सायंकाळी याच मार्गावर एसटी बस सोडण्यात येतील. प्रायोगिक तत्वावर या बस चालवण्यात येतील. त्यानंतर हळूहळू त्यांच्या वाढवण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून आणखी १५० फेऱ्या

गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर २१ सप्टेंबरपासून आणखी १५० लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसाला होणाऱ्या ३५० लोकल फे ऱ्यांची संख्या ५०० पर्यंत पोहोचणार आहे. प्रवासीसंख्या २ लाख २५ ते २ लाख ३१ हजारापर्यंत पोहोचली आहे. वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि लोकल फे ऱ्या वाढवण्याची मागणी पाहता पश्चिम रेल्वेने आणखी १५० फे ऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव लोकल फेऱ्यांमध्ये ३० फे ऱ्या सकाळी आणि २९ फे ऱ्या सायंकाळी चालवण्यात येतील.

एसटी बससेवा

मार्ग    सुटण्याची वेळ

पनवेल ते मंत्रालय   स. ८.१५ वा.

डोंबिवली ते मंत्रालय  स.८.१५  वा.

विरार ते मंत्रालय स. ७.४५ वा.

(मंत्रालय येथून डोंबिवली आणि विरारसाठी सायंकाळी ५.३५ वाजता आणि पनवेलसाठी ५.४५ वाजता प्रत्येकी एक फेरी होईल.)