News Flash

दरड कोसळल्याने मुंबई-पुणे विशेष रेल्वे

मुंबई-पुणे द्रुतगर्ती मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची सोय करण्यासाठी आज पुणे आणि मुंबई दरम्यान रात्री आठ वाजता सोळा डब्यांच्या दोन विशेष रेल्वे गाड्यांची

| July 19, 2015 06:52 am

मुंबई-पुणे द्रुतगर्ती मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची सोय करण्यासाठी आज पुणे आणि मुंबई दरम्यान रात्री आठ वाजता सोळा डब्यांच्या दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

आज सकाळी आडोशी बोगद्याजवळ बोरघाटात दोन गाड्यांवर मोठी दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. या घटनेत दोन गाड्यांमधील दोघे जण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 6:52 am

Web Title: special train during mumbai pune
Next Stories
1 पावसाच्या सरी सरासरीपेक्षा कमीच
2 गोंदियातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना खुलासा करण्याचे आदेश
3 केंद्राच्या धर्तीवर भूसंपादन कायदा सरकारच्या हालचाली
Just Now!
X