15 July 2020

News Flash

आजपासून देशभरात विशेष रेल्वे फेऱ्या

स्थानकात ९० मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक

(संग्रहित छायाचित्र)

स्थानकात ९० मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक

मुंबई: सर्व सामान्य प्रवाशांसाठी १ जून पासून लांब पल्ल्याच्या २०० रेल्वे फे ऱ्यांना सुरुवात होत आहे. या सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. १ ते ३० जून दरम्यान २६ लाख प्रवाशांनी या गाडय़ांचे आगाऊ आरक्षण के ले आहे. प्रवासासाठी ९० मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक असून प्रवाशांना आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक के ले आहे.

सोमवारपासून सुरु होणाऱ्या या गाडय़ा पूर्णपणे आरक्षित आहेत. विनावातानुकू लित आणि वातानुकू लित डबे असून आसन प्रकारातील सामान्य डबेही प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

या गाडय़ांचे आरक्षण आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅ टरिंग अ‍ॅण्ड टूरिझम)संके तस्थळाबरोबरच स्थानकातील तिकीट खिडक्यांवरही उपलब्ध के ले आहे. फक्त कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक असून चादर, ब्लॅंके ट मिळणार नाही. तर प्रवाशांनाच जेवण आणि पाण्याच्या बाटलीची सोय करावी लागणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट के ले आहे. देशभरातून सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये महाराष्ट्रातून सुटणाऱ्या गाडय़ांचाही समावेश आहे. या गाडय़ांचे आरक्षण आधी ३० दिवस अगोदर करण्याची अट होती. परंतु त्यात बदल करुन १२० दिवस आधी करण्याचा निर्णय घेतला.

* प्रवाशांचे स्थानकात प्रवेश देण्याआधी थर्मल स्क्रि निंगद्वारे तपासणीही होईल.

* प्रवाशांना मास्कही घालणे बंधनकारक असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 3:31 am

Web Title: special train services across the country from today zws 70
Next Stories
1 चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणास सशर्त परवानगी
2 Coronavirus : मुंबईतील रुग्णसंख्या ३९,४६४
3 मोक्षसेवेचे स्टार्टअप!
Just Now!
X