महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करायला येणाऱ्या ‘भीमसागरा’साठी मध्य रेल्वेने विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून या सेवा चालवण्यात येणार असून मुख्य तसेच हार्बर मार्गावर मिळून १२ सेवा चालवण्यात येतील.

मुख्य मार्गावरील कुर्ला-दादर, कल्याण-दादर आणि ठाणे-दादर या अप दिशेकडील गाडय़ा अनुक्रमे ००.४५, १.०० आणि २.१० वाजता निघतील. या गाडय़ा दादरला अनुक्रमे १.००, २.१० आणि २.५० वाजता पोहोचतील. डाउन दिशेला जाणाऱ्या दादर-ठाणे, दादर-कल्याण आणि दादर-कुर्ला या गाडय़ा अनुक्रमे १.१५, २.२५ आणि ३.०० वाजता सुटतील. या गाडय़ा ठाणे, कल्याण आणि कुर्ला येथे अनुक्रमे १.५५, ३.३५ आणि ३.१५ वाजता पोहोचतील.
हार्बर मार्गावर अप दिशेकडे येणाऱ्या वाशी-कुर्ला, पनवेल-कुर्ला आणि मानखुर्द-कुर्ला या गाडय़ा अनुक्रमे १.३०, १.४० आणि ३.१० वाजता निघून कुर्ला येथे अनुक्रमे २.१०, २.४५ आणि ३.३० वाजता पोहोचतील. तर कुल्र्यावरून डाउन दिशेकडे जाणाऱ्या कुर्ला-मानखुर्द, कुर्ला-पनवेल आणि कुर्ला-वाशी या गाडय़ा अनुक्रमे २.३०, ३.३० आणि ४.०० वाजता निघतील. या गाडय़ा २.५०, ४.०० आणि ४.३५ वाजता अनुक्रमे मानखुर्द, पनवेल आणि वाशी येथे पोहोचतील.