News Flash

VIDEO : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कोणती वाट धुंडाळत आहेत?

भारत देश हा काही धर्मशाळा नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ९ फेब्रु्वारीला झालेल्या मनसेच्या महामोर्चादरम्यान एक भाषण केलं. हे भाषण बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकला ही भूमिका मांडणारं होतं. मात्र या भाषणात त्यांनी  असे काही मुद्दे मांडले जे ऐकून ते नेमकं कुणाबाबत बोलले ते अनाकलनीय आहे. ते नेमकी कोणती वाट धुंडाळत आहेत हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. आझाद मैदानावर त्यांनी सुमारे २० मिनिटं भाषण केलं. या भाषणात त्यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकला असं आवाहन केलं. पोलिसांना ४८ तास मोकळे द्या बघा ते कायदा आणि व्यवस्था कशी नीट ठेवतात असंही राज ठाकरे म्हणाले. मात्र आपल्या भाषणातून त्यांनी जे मुद्दे मांडले ते पाहून त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं हा प्रश्न पडतोच. त्यांच्या भाषणाचा अन्यवार्थ सांगणारा हा खास व्हिडीओ

पाहा व्हिडीओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 6:44 pm

Web Title: special video on raj thackerays 9th feb speech scj 81
Next Stories
1 VIDEO: ‘अहिंसा परमो धर्म:’ वगैरे ते गेलं सर्व खड्ड्यात…” मनसेने करुन दिली प्रबोधनकारांच्या विचारांची आठवण
2 हिंगणघाटमधील पीडितेच्या संघर्षाचा शेवट, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
3 मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई, वडील आणि भावाची आत्महत्या
Just Now!
X