News Flash

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाला गती

देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाने दिले होते.

देवनार कचराभूमीतील दुसऱ्या टप्प्यासाठी १६ कं पन्या इच्छुक

मुंबई : देवनारमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा आणखी एक प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी १६ कंपन्या इच्छुक आहेत. या नव्या प्रकल्पात दररोज १,२०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून २५ मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पालिके च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने याकरिता जागतिक पातळीवरील कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले होते. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत.

देवनार कचराभूमीवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या पालिके च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत एका प्रकल्पासाठी कंत्राटदार नेमल्यानंतर पालिके ने आता दुसऱ्या प्रकल्पाची तयारी सुरू के ली आहे. देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाने दिले होते. त्याअंतर्गत पालिके ने या ठिकाणी कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले होते. गेल्या सात वर्षांपासून पालिका त्याकरिता प्रयत्न करीत आहे. २०१४ मध्ये एकाच वेळी तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीकरिता पहिल्यांदा निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र एवढ्या मोठ्या स्तरावर प्रकल्प राबवण्याकरिता कोणी कं त्राटदार पुढे येत  नव्हते. त्यामुळे पालिके ने कमी क्षमतेचे तीन प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते. त्यापैकी ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. तीन वेळा निविदा मागवल्यानंतर मे २०१९ मध्ये कं त्राटदार पुढे आले. त्यातून एका कं त्राटदाराची निवड करून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कार्यादेश देण्यात आले होते. आता त्याचाच पुढचा भाग म्हणून १२०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा आणखी एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याकरिता पालिके ने जागतिक स्तरावरील कं पन्यांकडून स्वारस्य अभिरुची प्रस्ताव मागवले होते. त्याकरिता १६ कं पन्या पुढे आल्याची माहिती पालिके च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या कं पन्यांनी आपले सादरीकरण के ले असून काही सूचनाही के ल्या आहेत. त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष कामासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरुवात होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता घन कचरा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रकल्प काय?

  •  पहिल्या प्रकल्पात ६०० मेट्रिक टन कचऱ्यापासून दरदिवशी ४ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे.
  •  या प्रकल्पासाठी अद्याप पर्यावरणाशी संबंधित परवानगी मिळवण्यात येत असून हा प्रकल्प सुरू होण्यासाठी अद्याप ४० महिन्यांचा काळ लागणार आहे.
  •  या प्रकल्पासाठी पालिका १०५६ कोटी खर्च करणार आहे.
  • नव्या प्रकल्पात १२०० ते १८०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याची क्षमता असेल. त्यासाठी १०२० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:09 am

Web Title: speed up the power generation project garbage akp 94
Next Stories
1 ‘आरे’ची अग्निपरीक्षा सुरूच
2 २८ वर्षांपासून थकवलेल्या मालमत्ता कराचा भरणा
3 प्रवाशांच्या सेवेत सुविधांयुक्त प्रतीक्षालये
Just Now!
X