News Flash

महालक्ष्मी जवळ मर्सिडीज कारने पादचाऱ्याला चिरडलं, आरोपी हिरे व्यापाऱ्याचा मुलगा

मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सजवळ भरधाव मर्सिडीज कारने एका पादचाऱ्याला चिरडलं.

मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सजवळ भरधाव मर्सिडीज कारने एका पादचाऱ्याला चिरडलं. सोमवारी रात्री घडलेल्या या अपघातात पादचारी राजेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला आहे. ते भाजी विकत घेण्यासाठी चालले होते. पोलिसांनी या प्रकरणी कार चालक चैतन्य अदानीला अटक केली आहे. त्याचे वडिल हिरे व्यापारी आहेत.

हाजी अली रोडवरील सिग्नल सुटल्यानंतर चैतन्यची मर्सिडीज दुसऱ्या कारला ओव्हरटेक करुन महालक्ष्मी स्टेशनच्या दिशेने जात होती. त्यावेळी चैतन्य अदानीचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व त्यांनी रस्त्यावरुन चालत असलेल्या राजेंद्र कुमार यांना चिरडलं.

हा अपघात इतका भीषण होता की, चैतन्यची मर्सिडीज महालक्ष्मी रेसकोर्सची संरक्षण भिंत तोंडून आत शिरली. ताडदेव पोलिसांनी चैतन्यला अटक केली असून त्याला आज कोर्टात हजर करण्यात येईल .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 7:54 am

Web Title: speeding car ran over a pedestrian near mahalaxmi railway station
Next Stories
1 पेपर तपासणीवर संशय
2 पूलबंदीमुळे बेस्टला लाखोंचा फटका
3 शाळेच्या विश्वस्तांवर ‘मार्कफिक्सिंग’चा आरोप
Just Now!
X