News Flash

घसरलेले विमान हटवण्याचे काम अजूनही सुरूच

मुख्य धावपट्टी पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी विलंब लागू शकतो असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबई विमानतळावर सोमवारी रात्री उतरताना धावपट्टीवरून घसरलेले स्पाइसजेटचे विमान हटवण्याचे काम गुरुवारी रात्रीपर्यंत सुरूच होते. विमान घसरण्याच्या घटनेमुळे मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आली असून त्यावरील वाहतूक पूर्वपदावर आलेली नाही. याचा फटका ३५१ विमान सेवांना तीन दिवसांत बसला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत विमान हटवण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्पाइसजेटचे जयपूर-मुंबई हे १६७ प्रवाशांना घेऊन आलेले विमान सोमवारी मुंबई विमानतळावर उतरत असताना रात्री ११.५२ वाजता धावपट्टीवरून घसरले. तेव्हापासून विमानांचा मार्ग बदलणे, उड्डाणे रद्द करण्याचे सत्र गुरुवारी रात्रीपर्यंत सुरूच होते. यामुळे बुधवारी रात्रीपर्यंत ३२० विमान सेवांना फटका बसला होता. तर गुरुवारी त्यामध्ये आणखीन ३१ विमान सेवांची भर पडली. गुरुवारी दिवसभरात इंडिगोची १० उड्डाणे रद्द केली, तर मुंबई विमानतळावर येणारी ११ विमाने रद्द करण्यात आली. तसेच सहा विमानांना दुसरीकडे वळवण्यात आले. मुख्य धावपट्टी पूर्णपणे कार्यरत होण्यासाठी विलंब लागू शकतो असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. या पाश्र्वभूमीवर मुंबई विमानतळ प्रशासनाकडून गुरुवारी दुपापर्यंत नोटॅम (वैमानिकांसाठी सूचना) जारी करण्यात आली. वैमानिकांसाठी मार्गावर अडथळ्याची परिस्थिती असू शकते अशा अर्थाची ही सूचना असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सूचनेचा कालावधी गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आला.

१२ वैमानिकांना कारणे दाखवा नोटीस

गेल्या काही दिवसांत देशभरात वेगवेगळ्या विमानतळांवर विमान धावपट्टी सोडून घसरण्याच्या सहा घटनांच्या पाश्र्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून १२ वैमानिकांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तसेच या वैमानिकांना उड्डाणापासून रोखण्यात आले आहे. स्पाइसजेट, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि गो एअरच्या वैमानिकांचा यामध्ये समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:26 am

Web Title: spicejet plane skids off runway at mumbai airport zws 70
Next Stories
1 मुख्यमंत्री येता दारा, होई रस्ता गोजिरा!
2 पालिका पूल खरवडणार!
3 संरक्षक भिंत उभारणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस
Just Now!
X