News Flash

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील खबऱ्याला अटक

अटक आरोपी सलीम हा महाराज किंवा बटरफ्लाय या टोपण नावाने ओळखला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई:  पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील खबरी अशी ओळख असलेल्या सलीम फर्निचरवाला ऊर्फ सलीम महाराज याला सोमवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बेडय़ा ठोकल्या.  संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या एजाझ लकडावाला याला मुंबईतील व्यावसायिकांची इत्थंभूत माहिती पुरवून खंडणी उकळण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

अटक आरोपी सलीम हा महाराज किंवा बटरफ्लाय या टोपण नावाने ओळखला जातो. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार कधी एजाझचे तर कधी दाऊद टोळीतील पसार गुंड फहीम मचमच याचे नाव घेऊन सलीम याने स्वत:च मुंबईतील अनेक व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावले होते. गुन्ह्य़ांची, गुन्हेगारी किंवा अवैध कृत्याची माहिती पोलिसांना द्यायची, नंतर स्वत:च मध्यस्थी करून तडजोड करून घ्यायची आणि त्या माध्यमातून लाखो रुपये पदरी पाडून घ्यायचे यात सलीमचा हातखंडा आहे. त्याच्या चौकशीतून अशा असंख्य तडजोडी, त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावेही पुढे येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:53 am

Web Title: squad crime branch mumbai police akp 94
Next Stories
1 विलेपार्ले येथे वृद्ध महिलेची मुलीसह आत्महत्या
2 ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची ४० टक्के पदे रिक्त
3 विद्यापीठाच्या गुणपत्रिकाही ऑनलाइन
Just Now!
X