गुणपत्रकांचे वाटप २९ नोव्हेंबर रोजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या दहावीच्या परीक्षांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी (२६ नोव्हेंबर)  जाहीर करण्यात येणार आहेत, तर विद्यार्थ्यांना २९ नोव्हेंबरला गुणपत्रक देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये, तर बारावीची परीक्षा २५ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षांचे ऑनलाईन निकाल २६ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना २९ नोव्हेंबरला गुणपत्रक देण्यात येणार आहे. गुणपडताळणीसाठी २९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबपर्यंत या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीच्या अर्जासोबत गुणपत्रिकेची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहे.
मंडळाच्या www.msbshse.ac.in किंवा www.mahresult.nic.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.