अनुत्तीर्ण आणि परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची बारावीची पुरवणी परीक्षा दहावीप्रमाणे सप्टेंबर-ऑक्टोबर ऐवजी जुलै-ऑगस्टमध्येच घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने घेतला आहे.
आतापर्यंत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फेरपरीक्षेचे आयोजन केले जाई. परंतु, आता त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून मार्च-एप्रिलच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेचच म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यातच या पुरवणी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे.
गेल्या वर्षी दहावीची परीक्षा घेऊन मंडळाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. आता बारावीकरिताही हा निर्णय घेण्यात आला आहे. अनुत्तीर्ण, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या, तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.