पुस्तकांच्या किमतींमध्ये वाढ

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाची पुस्तकांची प्रतीक्षा संपणार असून मंगळवारपासून (३ एप्रिल) पुस्तके बालभारतीच्या भांडारात उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये दुकानांमध्ये किरकोळ विक्रीसाठी ही पुस्तके मिळू शकतील. नवी पुस्तके खिशाला मात्र जड ठरणारी असून प्रत्येक विषयामागे साधारण दहा रुपयांनी नव्या पुस्तकांची किंमत वाढली आहे.

curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
csir recruitment 2024 job opportunities at csir job vacancies in csir
नोकरीची संधी
slip stitch and stumble the untold story of india s financial sector reforms
बुकमार्क : ती वीसेक आणि आताची दहा वर्षे!

दहावीची पाठय़पुस्तके येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१८-१९) बदलत आहेत. या नव्या पुस्तकांची प्रतीक्षा आता संपली असून उन्हाळी वर्गासाठीही नवी पुस्तके उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) ही पुस्तके बालभारतीच्या भांडारात मंगळवारपासून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये बाजारपेठेत किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ही पुस्तके उपलब्ध होऊ शकतील. सर्व माध्यमांतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे बालभारतीकडून सांगण्यात आले आहेत. लवकर आलेल्या पुस्तकांनी विद्यार्थी आणि पालकांना दिलासा दिला असला तरी खिशाला मात्र पुस्तके जड ठरणार आहेत. पुस्तकांच्या किमतींमध्ये यंदा वाढ झाली आहे. प्रत्येत पुस्तकाची किंमत साधारण १० ते १५ रुपयांनी वाढली आहे. पुस्तकांच्या नव्या संचासाठी आता साडेसहाशे रुपये मोजावे लागणार आहेत.

पुस्तकांबाबत चर्चासत्र

दहावीच्या नव्या पाठय़पुस्तकांबाबत बालभारतीकडून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या पाठय़पुस्तकांची ओळख व्हावी, स्वरूप समजावे, मूल्यमापन प्रक्रियेतील बदल अशा मुद्दय़ांवर हे चर्चासत्र घेण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकही या चर्चासत्रासाठी हजेरी लावू शकतील. बुधवारी (४ एप्रिल) शिवाजी नाटय़मंदिर, दादर येथे हे चर्चासत्र होणार आहे. गणेश बुक सेंटर, एस.व्ही. रस्ता, बोरिवली, एच. के. बुक एजन्सी, सूर्यनगर विक्रोळी, धनलाल ब्रदर्स, एस. गांधी मार्ग, मुंबई, आयडियल बुक डेपो, दादर, जवाहर बुक डेपो, विलेपार्ले, विक्रम बुक डेपो, ठाणे, राकेश बुक स्टेशन, पनवेल, गणेश जनरल स्टोअर्स, डोंबिवली या ठिकाणी या चर्चासत्राच्या प्रवेशिका मिळतील.

विषय (कंसात नवी किंमत)

मराठी, इंग्रजी (प्रथम भाषा, ७३), विज्ञान भाग एक आणि दोन (१४०), बीजगणित (८०), भूमिती (७७), इतिहास आणि राज्यशास्त्र (५६), भूगोल (४३), इंग्रजी (द्वितीय भाषा, ८८), हंदी (तृतीय भाषा, ५७)

ऐन परीक्षेच्या काळात प्रशिक्षणे

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रशिक्षणामध्ये पुढील आठवडय़ापासून सुरुवात होणार आहे. मात्र सध्या शाळांच्या त्यांच्या स्तरावरील परीक्षा, मूल्यमापन आणि वार्षिक कामे सुरू आहेत. त्यामुळे या वेळापत्रकाबाबत शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेची कामे संपल्यानंतर ही प्रशिक्षणे घेण्यात यावीत, असे मत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.