परीक्षेच्या शेवटच्या दिवशी पेपर झाल्यावर घरी परतत असताना दहावीच्या विद्यार्थ्याचा ट्रेन मधून पासून मृत्यू झाला. झुबेर सिद्दिक असे या विद्यार्थ्यांचे नाव असून डॉकयार्ड रोड ते सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान ही घटना घडली.

झुबैर सिद्दिक हा शुक्रवारी सीएसटीएम स्थानकावरून वडाळा येथे घरी जात होता. त्याचा शुक्रवारी शेवटचा पेपर होता. पेपर झाल्यावर झुबैर आणि त्याचे अंजुमन इस्लाम येथे गेले. नमाजनंतर ते घरी जाण्यासाठी निघाले. यादरम्यान झुबैरच ट्रेन मधून पडून मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनासाठी धाव घेतली. झुबैरकडील मोबाईलवरून त्यांनी वडिलांशी संपर्क साधला आणि त्यांना अपघाताची माहिती दिली. झुबैरट्रेन मधून नेमका कसा पडला हे आजून समजू शकलेले नाही. मात्र ती स्टंट करत असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.