उत्पन्नासाठी एसटी महामंडळाने बाटलीबंद पाण्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘नाथजल’ नावाने हे बाटलीबंद पाणी १० आणि १५ रुपयांत एसटीच्या सर्व बस स्थानकांत उपलब्ध होणार आहे. या योजनेचे लोकार्पण सोमवारी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले.

या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे पेयजल उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे. त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते. त्यांच्या आदराप्रीत्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास नाथजल हे नाव देण्यात आल्याचे अनिल परब म्हणाले. बाटलीबंद पाणीपुरवठय़ासाठी पुण्यातील एका खासगी संस्थेची निवड केली आहे.

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
pimpri chinchwad ev marathi news
पिंपरी : विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; दोन वर्षांनंतरही पालिकेची स्थानके कागदावरच!
kalyan railway station crime news,
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मजुरावर चाकू हल्ला, मजुरीचे दोन हजार रूपये लुटले
pune metro station marathi news, pune metro marathi news
पुणे: स्थानकांच्या नावातून मेट्रो मालामाल! वर्षाला कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या महामेट्रोचा फंडा

सर्व बस स्थानकांवर ६५० मिलिलिटर व १ लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये नाथजल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यांचा दर अनुक्रमे १० रुपये व १५ रुपये इतका असेल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व बस स्थानकांवर हे पेयजल उपलब्ध होणार आहे.  यातून प्रत्येक ६५० मिलिलिटर बाटलीबंद पाण्यामागे ४५ पैसे आणि एक लिटल बाटलीबंद पाण्यामागे एक रुपये एसटीला मिळणार आहे.

गेले दोन महिने १ हजार बससाठी सुमारे ४ हजार ५०० पेक्षा अधिक एसटी कर्मचारी  बेस्ट वाहतुकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था एका खासगी संस्थेला देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या. याची दखल घेऊन सदर कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. तसेच कर्मचारी राहत असलेल्या निवासव्यवस्थेची रोज पाहणी करण्यासाठी  सात पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्याद्वारे कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या निवासव्यवस्थेबाबत अहवाल सादर करण्यात येणार आहे.

बेस्टच्या सेवेत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना रोज रोख भोजनभत्ता

बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज भोजनभत्ता देण्यात यावा, असे निर्देश परब यांनी दिले आहेत. गेले दोन महिने १ हजार बससाठी सुमारे ४ हजार ५०० पेक्षा अधिक एसटी कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतुकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था एका खासगी संस्थेला देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने  अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या.