१८ टक्क्यांची वाढ; वर्षांला दीड हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा

वेतनवाढ, इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळावर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने तिकीट दरांत १८ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी १६ जूनपासून केली जात असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाची राहिलेली मंजुरी आणि काही तांत्रिक मुद्दय़ांमुळे १४ जूनच्या मध्यरात्रीपासून होणारी भाडेवाढ पुढे ढकलण्यात आली होती. ही भाडेवाढ १५ जूनच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच १६ जूनपासून केली जाणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटी महामंडळाला वर्षांला १,५०० कोटी रुपयांपर्यत अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता आहे. तिकिटाची भाडे आकारणी ही पाच पटीत असणार आहे.