News Flash

एसटीचे सारथ्य आता महिलांकडे

चालक-वाहक दुहेरी पदासाठी २१५ जणींना प्रशिक्षण

एसटी महामंडळाच्या बसगाडय़ांचे सारथ्य आता महिलाही करणार आहेत. त्यांना चालकाबरोबरच वाहकाचीही जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

‘एसटी’त २१५ महिलांच्या चालक-वाहक या दुहेरी जबाबदारीच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. त्यांत आदिवासी भागातील २१ महिला आहेत. एसटीत चालक-वाहक म्हणून प्रथमच महिलांची नियुक्ती करण्यात येईल. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून वर्षभरानंतर त्या सेवेत दाखल होतील, असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

एसटीत सध्या ४,५०० महिला वाहक आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून त्या सेवेत आहेत. आता चालक म्हणूनही महिला काम करतील. महिला चालकांची भरती प्रक्रिया साधारण २०१९ मध्ये सुरू झाली. सर्वसाधारण भागांतील १९४ आणि आदिवासी भागातील २१ महिलांची निवड करण्यात आली. त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. त्यानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण आणि अंतिम चाचणी घेतल्यानंतर या महिला चालक २०२१मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते. परंतु करोनामुळे त्यांचे प्रशिक्षणच थांबले. या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. वर्षभरात त्या सेवेत दाखल होतील. पुण्यातील भोसरी येथे एसटीचे मोठे चाचणी पथ असून तेथे अंतिम चाचणी होऊन त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

दुष्काळग्रस्त, आदिवासी भागातील उमेदवार

एसटी चालक-वाहक पदासाठी आदिवासी आणि दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार २१ महिला आदिवासी भागातील आहेत. उर्वरित दुष्काळग्रस्त भागातील असल्याचे सांगण्यात आले. त्यांची नियुक्ती पुणे, नाशिक, नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, जळगाव, सांगली विभागांत करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:25 am

Web Title: st is now driven by women abn 97
Next Stories
1 कोकणातील युवकांनी शेतीकडे वळावे
2 आयएनएस ‘करंज’ १० मार्चला नौदलाच्या ताफ्यात
3 ‘मुंबईत ‘कराची बेकरी’ पुन्हा सुरू होणार, नावही बदलणार नाही!’
Just Now!
X