एसटी महामंडळाच्या महत्त्वाच्या सेवा प्रकल्पातील शिवशाही वातानुकू लित शयनयान सेवा बंद झाली आहे. भाडेतत्त्वावरील असलेल्या या सेवेतून काही कं पन्यांनी घेतलेली माघार, प्रवाशांचाही अल्प प्रतिसादासह अन्य कारणे बंद होण्यास कारणीभूत ठरली. सध्या सुरू असलेल्या एसटीच्या विना वातानुकू लित शयनयान सेवेला मात्र चांगला प्रतिसाद असून वातानुकू लित शयनयान सेवेचा सध्या तरी विचार होणार नसल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑगस्ट २०१८ मध्ये भाडेतत्त्वावरील शिवशाही शयनयान वातानुकूलित बस सेवेत आली आणि पहिली बस शिरपूर (धुळे) ते पुणे मार्गावर धावली. त्यानंतर या सेवेचा विस्तार के ला गेला. एसटीने या बस गाडय़ांसाठी मुंबई ते कोल्हापूर, जळगाव, परळी, अक्कलकोट, आंबेजोगाई, पुणे ते नांदेड, लातूर ते कोल्हापूर, औरंगाबाद ते मुंबई सेंट्रल यासह अन्य मार्ग निवडले. मात्र एक हजार रुपयांपेक्षा जास्त भाडे त्यातुलनेत खासगी सेवांचे कमी दर यातून एसटीच्या सेवेला कमी प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे फे ब्रुवारी २०१९ मध्ये शिवशाही वातानुकू लित शयनयानचे विविध मार्गावरील प्रवास भाडे २३० ते ५०५ रुपयांनी कमी के ले. तरीही या सेवेचे सरासरी प्रवासी भारमान ३५ ते ४० टक्के पर्यंतच राहिले.

एसटी महामंडळाच्या अटी, शर्ती, भाडेतत्त्वावर देणाऱ्या कं पन्यांनाही होणारे नुकसान पाहता यातील काही कं पन्यांनी सेवेतून माघार घेतली. त्यामुळे एकू ण ६८ पैकी ३० वातानुकू लित शयनयान बसगाडय़ाच ताफ्यात राहिल्या. मार्च २०२० मध्ये टाळेबंदीत ही सेवा पूर्णपणे बंद झाली आता एसटीच्या ताफ्यात एकही वातानुकू लित शयनयान बस नसून ती चालवण्यास महामंडळानेही उत्सुकता दाखवलेली नाही.

राज्यात मोठय़ा प्रमाणात धावणाऱ्या खासगी बसमुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडते. या प्रवाशांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी महामंडळाने शिवशाही शयनयान वातानुकूलित बस दाखल करण्याचा निर्णय घेतला.

जानेवारी २०१८ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात राष्ट्रीय कृतज्ञता दिवस आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी वातानुकू लित शयनयान स्लीपर बसचे उद्घाटन करण्यात आले होते. ही सेवा रातराणी म्हणून चालवण्याची योजना होती.

एसटीच्या शिवशाही वातानुकू लित शयनयान सेवेतून काही कंपन्यांनी माघार घेतली. तर अन्य काही कंपन्यांच्या गाडय़ांमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने त्यांची सेवाही थांबवली. सध्या एकही वातानुकू लित शयनयान बस एसटीच्या ताफ्यात नाही. त्या चालवण्याचा सध्या विचार नाही. नंतर त्याचा विचार के ला जाऊ शकतो.   – शेखर चन्नो, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

विनावातानुकूलित सेवेला प्रतिसाद

सध्या एसटीच्या ताफ्यात स्वत:च्या २०० विना वातानुकू लित शयनयान बस आहेत. त्याचे प्रवासी भारमान ६० टक्के असून चांगला प्रतिसाद आहे. मात्र त्यांचीही संख्या आणखी वाढवण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.