एसटी कर्मचाऱ्यांनी आठ आणि नऊ जूनला अघोषित संप पुकारला होता. या संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळली आहे. एसटी प्रशासनाने संपात सहभागी झालेल्या तब्बल ११४८ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी प्रशासनाच्या या धक्कादायक निर्णयामुळे सेवेत नव्याने भरती झालेल्या अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये सध्या परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे नेते आणि आमदार दिवाकर रावते राज्याचे परिवहन मंत्री आहेत.

एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे अनेक मराठी तरुण बेरोजगार होणार आहेत. वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांचा अघोषित संप पुकारण्यात आला होता. या संपादरम्यान ३७२ कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

दोन दिवसांत ९३ बस गाडयांचे नुकसानही करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यात १९ शिवशाही बस गाडयांचाही समावेश होता. संप केल्याने एसटीचा ३३ कोटी रुपयांचा महसूलही बुडाला. संप मागे घेण्यासाठी ९ जून रोजी एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह, अन्य संघटनांची बैठक झाली. यात वेतनवाढसंदर्भातील मागणी मान्य झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St strike employees participated suspended
First published on: 20-06-2018 at 11:15 IST