News Flash

ई-पासशिवाय एसटी प्रवास

चार स्तरांतील जिल्ह्य़ात प्रवास करणे आजपासून शक्य;  मुंबईत बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेने

सामान्यांसाठीही एसटीची सेवा पूर्ववत

चार स्तरांतील जिल्ह्य़ात प्रवास करणे आजपासून शक्य;  मुंबईत बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेने

मुंबई: करोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी वगळता एसटीची राज्यातील सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच होती. आता सोमवारपासून सामान्यांसाठीही एसटीची सेवा पूर्ववत होत आहे. काही जिल्ह्य़ात निर्बंध शिथिल होत असल्याने एसटीने एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ातही जाता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली. राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच करोनाचे निर्बंध शिथिल के ले आहेत. यात पहिल्या चारही स्तरांत मोडणाऱ्या जिल्ह्य़ात प्रवास ई-पासशिवाय करता येणार आहे.

दुसरी लाट सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या ओसरू लागली. त्यातच टाळेबंदीचे नियम कठोर करतानाच प्रवासावरही निर्बंध आले. एसटीची जिल्हा ते जिल्हा सेवा बंदच राहिली. तर अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी एसटी चालवण्यात आल्या.

परिणामी एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न कमी झाले. सध्या राज्यात एसटीतून दररोज १० हजारच प्रवासी प्रवास करू लागले आणि ३० ते ४० लाख रुपये उत्पन्न मिळू लागले.

सोमवारपासून राज्यातील निर्बंध शिथिल होत असल्याने एसटी महामंडळाला काहीसा दिलासा मिळणार आहे.

राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करताना पहिल्या स्तरातील नागपूर, अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, यवतमाळमध्ये सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.

तसेच दुसऱ्या स्तरातील हिंगोली, नंदुरबारमध्येही निर्बंध शिथिल के ले आहेत. तिसऱ्या व चौथ्या स्तरातील जिल्ह्य़ात ५० टक्के क्षमतेने वाहतूक सुरू राहील. या चारही स्तरांत जिल्हा ते जिल्हा प्रवासही करता येणार आहे. पाचव्या स्तरात मोडणाऱ्या जिल्ह्य़ात निर्बंध कठोर असल्याने अन्य जिल्ह्य़ातून येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक असणार आहे.

गोंधळाची परिस्थिती

यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्न्ो यांनी, शासनाच्या नियमानुसार राज्यातील सुरुवातीच्या चार टप्प्यात मोडणाऱ्या जिल्ह्य़ांत एसटी सेवा पूर्ववत होईल. जिल्हा ते जिल्हा प्रवास करता येणार असल्याचे सांगितले. तरीही याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार असल्याने त्यांच्याशी चर्चा होत आहे.

यात काही जिल्ह्य़ांतील अंर्तगत सेवाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने आहे. त्यामुळे या जिल्ह्य़ातून अन्य राज्यांत जाणाऱ्या एसटी सेवांच्या नियोजनाबाबतही चर्चा होत असल्याचे ते म्हणाले.

एसटीचे ऑनलाइन आरक्षण

काही तांत्रिक कारणांमुळे एसटीच्या लांब पल्ल्याच्या व मध्यम पल्ल्याच्या गाडय़ांचे ऑनलाइन आरक्षणही सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू होईल. तोपर्यंत आगारात लांब पल्ल्याची एसटी उपलब्ध असल्यास गाडीतच प्रवाशांना वाहकाकडून तिकीट मिळेल, असेही चन्न्ो यांनी स्पष्ट के ले. प्रवाशांची मागणी व गर्दी पाहूनच एसटी बसगाडय़ांचे नियोजन के ले जाणार असून सरसकट सर्वच गाडय़ा सोडल्या जाणार नसल्याचेही सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 12:05 am

Web Title: st travel allowed without e pass in maharashtra zws 70
Next Stories
1 “काय नाटक आहे? कसलं कर्तव्य आणि कसलं काय”, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!
2 मुंबईत उद्यापासून सर्वसामान्यांसाठी ‘बेस्ट’ बससेवा सुरू!
3 पर्यावरणमंत्र्यांच्या मतदारसंघातच झाडांची कत्तल! हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार – प्रवीण दरेकर
Just Now!
X