14 December 2017

News Flash

काळीमा!

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या, छेडछाडीच्या घटना घडत आहेत. डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरात

प्रतिनिधी, मुंबई | Updated: December 12, 2012 3:56 AM

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या, छेडछाडीच्या घटना घडत आहेत. डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरात तर छेडछाडीच्या घटनांची मालिकाच सुरू आहे. मंगळवारीही तेथे छेडछाडीची आणखी एक घटना घडली. त्याहून भयंकर म्हणजे ज्याच्यावर विश्वासाने शाळकरी मुलांची जबाबदारी सोपविली जाते, रिक्षावाले काका म्हणून ज्यांना संबोधले जाते, त्यातल्याच एकाने एका चार वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी डोंबिवलीत उघडकीस आली. पुण्यात एकतर्फी प्रेमातून मुंबईत सूडातून तरुणींवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनांमुळे महाराष्ट्रालाही ‘बिमारू’ असा कलंक लागतो काय अशी शंका बळावत चालली असून, याबद्दल सुजाण नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कांदिवलीत विवाहित महिलेला जाळण्याचा प्रयत्न
मुंबई : कांदिवली येथे एका विवाहित महिलेच्या अंगावर कीटकनाशक रसायन फेकण्याचा तसेच लायटरने जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारात ही महिला ४० टक्के भाजली आहे. पोलिसांनी आरोपीला अवघ्या दीड तासात अटक केली. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदिवली पूर्व येथील वडारपाडय़ात राहणारी पूनम माने (नाव बदलेले) ही महिला मंगळवारी सकाळी आपल्या शेजारी राहणाऱ्या मीनल जिमन नावाच्या महिलेच्या घरात अन्य एका महिलेसह टीव्ही पाहत बसली होती. त्यावेळी आरोपी सचिन शिगवण (२९) त्या घरात शिरला. त्याने सोबत आणलेले ‘रेड हिट’ हे कीटकनाशक पूनमच्या तोंडावर फेकले. त्यापाठोपाठ त्याने लायटरने आगही लावली.  पूनमला वाचविण्यासाठी मीनल मध्ये पडली तर तिसरी महिला तेथून पळून गेली. या प्रकारात मीनलसुद्धा जखमी झाली. या दोघींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर सचिन शिगवण पळून गेला होता. त्याला नंतर समता नगर पोलिसांनी त्याच परिसरातून अटक केली.  

पुण्यात विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला
पुणे : फग्र्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेला शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्याच प्रवेशद्वाराजवळ एका तरुणाने कोयत्याने हल्ला केला. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. तो एकतर्फी प्रेमातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हल्लेखोर तरूणाला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला १५ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोथरूडमधील अनमोल अतुल जाधवराव (वय २३) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. चतु:श्रुंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माजी नगरसेवकाची मुलगी फग्र्युसन महाविद्यालयात विज्ञान शाखेला शिकते. ती सोमवारी सायंकाळी तास संपवून बाहेर पडत होती. त्या वेळी महाविद्यालयाच्या प्रदेशद्वाराजवळ एक तरूण मोटारीतून आला. त्याने त्या तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती त्याच्याशी न बोलता तशीच पुढे जाऊ लागली. त्यावर तरुणाने तिच्या खांद्यावर कोयत्याने वार केले व तो पळून गेला. या मुलीसोबत मैत्रीण होती. त्या दोघी नंतर रुग्णालयात गेल्या. तिच्यावर उपचार करून तिला लगेच सोडण्यात आले.   

First Published on December 12, 2012 3:56 am

Web Title: stain
टॅग Atrocity,Crime,Tease