20 October 2019

News Flash

लोअर परळ स्थानकाबाहेर चेंगराचेंगरी

बीएमसी प्रशासन जलद गतीनी दूरूस्तीचे काम पुर्ण करत नसल्यामुळे मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

परळ-एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा एकदा मुंबईत लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेर मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. लोअर परळ स्थानका बाहेरील रेल्वे ब्रिज दुरूस्तीसाठी गेली वर्षभर बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना अरुंद अशा रस्त्यावरून ये जा करावी लागत आहेत. आज ऑफिस सुटल्यानंतर नेहमी प्रमाणेच मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाले होते. दरम्यान ही घटना घडली.

या अरूंद मार्गावरील कोंडीत अडकलेले प्रवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच बीएमसीच्या एका ट्रकमुळे वडापावच्या गाडीवरील तेलाची कढई पडली. या अपघाताता एका मुलीचे दोन्ही पाय भाजले. या दूर्देवी घटने नंतर संतप्त प्रवाशांनी बीएमसीच्या ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली. तसेच ट्रकचीही तोडफोडही केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तणावपूर्ण परीस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या परीस्थिती पूर्ववत झाली आहे. मात्र परळ-एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेली चेंगरा चेंगरी व प्रभादेवी पूल दूर्घटने नंतरही रेल्वे आणि बीएमसी प्रशासन जलद गतीनी दूरूस्तीचे काम पुर्ण करत नसल्यामुळे मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

First Published on April 22, 2019 11:26 pm

Web Title: stampede at lower parel railway station