News Flash

स्टॅनस्वामी जामिनासाठी उच्च न्यायालयात

करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याची मागणी स्टॅन स्वामी यांनी केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेले ८३ वर्षांचे फादर स्टॅन स्वामी यांनी जामीन नाकारण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याची मागणी स्टॅन स्वामी यांनी केली आहे.

स्टॅन स्वामी यांनी वैद्यकीय कारणास्तव त्याच वेळी आपल्याविरोधात पुरावा नसल्याचा दावा करत गुणवत्तेच्या आधारे जामीन देण्याच्या मागणीसाठीही स्वतंत्र अर्ज केला होता.

विशेष न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. मात्र आता करोनाची स्थिती गंभीर असून वैद्यकीय कारणास्तव आपली तातडीने जामिनावर सुटका करण्याची मागणी स्टॅन स्वामी यांनी केली आहे.

स्टॅन स्वामी यांनी विशेष न्यायालयाच्या दोन्ही आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी झालेला विलंब माफ करण्याची मागणीही स्टॅन स्वामी यांनी केली आहे.

विशेष न्यायालयाने आपल्याला जामीन नाकारण्यात चूक केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 1:04 am

Web Title: stanswamy in the high court for bail abn 97
Next Stories
1 ‘…तेव्हा आमच्याकडे दुर्लक्ष’
2 वैद्यकीय प्राणवायूच्या योग्य वापराकरिता नियमावली
3 राज्यात २४ तासांत ८९५ करोनाबळी
Just Now!
X