News Flash

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये पर्व स्टार्टअपचे..

याचबरोबर शहरातील बडे उद्योजकही नवउद्यमींच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

‘बदलता महाराष्ट्र’मध्ये पर्व स्टार्टअपचे..

नवउद्योगाच्या वाटेवरील तंत्र उलगडणार

देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईला देशाची स्टार्टअपची राजधानी अशी ओळख मिळवून देण्याचा सरकारचा मानस आहे. हे करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना तयार करण्यात आल्या आहेत. याचबरोबर शहरातील बडे उद्योजकही नवउद्यमींच्या पाठीशी उभे राहिले आहेत. यामुळेच आज राज्यात तंत्रज्ञानाधारित नवउद्यमांच्या जोडीलाचा कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध विषयांशी संबंधित नवउद्योग उभे होत असल्याचे दिसत आहेत. या उद्योगांना पोषक वातावरण असले तरी अनेक जण आजही ठेचा खात आहेत. नवउद्यमाच्या या वाटेवरून जाताना यशाचे कोणते नवे मंत्र आणि तंत्र समजून घेतले पाहिजेत हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘बदलता महाराष्ट्र’  या उपक्रमांतर्गत  ‘पर्व स्टार्टअप’चे या दोन दिवसीय परिसंवादाचे येत्या २९ व ३० नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. हा परिसंवाद ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर लिमिटेड’ यांच्या सहकार्याने होत असून कार्यक्रम पॉवर्डबाय ‘केसरी’ आहे. या कार्यक्रमाला टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी २४ तास’ची साथ लाभली आहे. या परिसंवादात स्टार्टअप कसे सुरू केले याबाबत विविध स्टार्टअपचे संस्थापक संवाद साधणार आहेत. तर स्टार्टअप उभारताना निधी उभारणीचे आव्हान कसे पेलता येऊ  शकेल याबाबत खासगी तसेच सरकारी गुंतवणूक संस्थांचे प्रतिनिधी प्रकाश टाकणार आहेत. देशभरात स्टार्टअपबद्दल चर्चा होत असली तरी या क्षेत्रात अपयशी होणाऱ्यांचे प्रमाणही खूप आहे. पण अपयशाने खचून न जाता चुका सुधारून पुन्हा यशाच्या शिखरावर पोहचलेली मंडळी नवउद्योगातील चुका कशा टाळता येतील याबाबत सांगणार आहेत. तर स्टार्टअप उभारून त्याचे मोठय़ा उद्योगात रूपांतर करण्यात यश मिळालेले यशस्वी संस्थापक त्यांच्या यशाचे गमक उलगडणार आहेत. याशिवाय स्टार्टअपच्या उभारणीत सरकारी यंत्रणांची भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे, त्यात काय उणिवा आहेत, अशा प्रश्नांबाबतही यामध्ये चर्चा होणार आहे.

‘बदलता महाराष्ट्र’मधील या परिसंवादाचे उद्घाटन मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी पेटीएम बँकेचे उपाध्यक्ष अभिषेक अरुण यांच्या भाषणाने होणार आहे. स्टार्टअप उभारताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे तसेच नवउद्योगाच्या उभारणीतील आव्हानांवर कशी मात करता येईल, देशात भविष्यात कोणत्या नवउद्योगांची गरज आहे, अशा विविध मुद्दय़ांवर अभिषेक अरुण आपल्या भाषणात प्रकाश टाकणार आहेत. तर परिसंवादाचा समारोप बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे.

दिवस पहिला

* उद्घाटन – अभिषेक अरुण, उपाध्यक्ष, पेटीएम बँक

* पहिले चर्चासत्र – ‘आमचे स्टार्टअपचे दिवस’

* सहभाग – मिहिर करकरे, सहसंस्थापक, सोशल वेव्हलेंथ; उत्साह खरे, सहसंस्थापक कारबाझी डॉट कॉम; श्रीकृष्ण भारंबे, सहसंस्थापक फिंगरलिक्स

* दुसरे चर्चासत्र – ‘गुंतवणुकीचे आव्हान’

* सहभाग – डॉ. रवी त्यागी, प्रमुख, सिडबी व्हेंचर्स; शैलेश घोरपडे, व्यवस्थापकीय भागीदार आणि मुख्य माहिती अधिकारी, एक्स्फिनिटी व्हेंचर्स; सतीश कटारिया, व्यवस्थापकीय संचालक, कॅटापूल्ट

तिसरे चर्चासत्र – ‘अपयशातून यशाकडे’

सहभाग – आशीष शाह, संस्थापक, व्हटरेझ; शैलेश संसारे, सल्लागार; किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रोविस्टो

दुसरा दिवस

* चौथे चर्चासत्र  – ‘स्टार्टअप सुरू करताना..’

* सहभाग – प्रा. मिलिंद अत्रे, साइन, आयआयटी; प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी उस्मानाबाद,; मृदुला बर्वे, संस्थापक, ओपंडित डॉट कॉम

* पाचवे चर्चासत्र – ‘यशाचे गमक’

* सहभाग – परेश राजदे, सुविधाचे संस्थापक; राकेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी इंडस ओएस; सचिन टेके- एम इंडिकेटरचे संस्थापक

 

* सहावे चर्चासत्र – ‘स्टार्टअप महाराष्ट्राची वाटचाल’

* सहभाग – दीपक घैसास, अर्थतज्ज्ञ; महेश मूर्ती, बीजभांडवलदार; दीपक फाटक, प्राध्यापक, आयआयटी, मुंबई

* समारोप – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2016 4:43 am

Web Title: startup topic in badalta maharashtra
Next Stories
1 परिस्थिती  लवकरच पूर्वपदावर
2 नगरपालिकांची सत्ता कोणाकडे?
3 तीन महिन्यांत महाराष्ट्र रोकडरहित!
Just Now!
X