News Flash

राज्य सहकारी बँकेला ३२५ कोटींचा नफा

देशपातळीवर व्यापारी बँकांचे सदर प्रमाण ४६ टक्के आहे, तर सहकारी बँकांचे ६४ टक्के आहे.

राज्य सहकारी बँकेला ३२५ कोटींचा नफा
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्यातील सहकारी संस्थांची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १,३४५ कोटींचा ढोबळ तर ३२५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तर बँकेचे निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण शून्यावर आले असून बँकेच्या १०९ वर्षांच्या वाटचालीत आर्थिक वर्षात बँकेने अनेक उच्चांक प्रस्थापित केल्याची माहिती बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली.

बँकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली त्या वेळी अनास्कर यांनी ही माहिती दिली. अहवाल वर्षात राज्य बँकेने प्रथमच एकूण ४१ हजार ६६६ कोटी इतकी उच्चांकी उलाढाल केली आहे. तसेच रिझव्र्ह बँक व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ९ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) राखणे आवश्यक असताना, राज्य बँकेने मार्च २०२० अखेर १३.११ टक्के इतके भांडवल पर्याप्तता प्रमाण राखले आहे. बँकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) २२८२ कोटी इतके झाले असून, बँकेचा स्वनिधी ४७८४ कोटींपर्यंत पोहोचला आहे. अहवाल वर्षात बँकेला १३४५ कोटींचा ढोबळ तर तरतुदींनंतर ३२५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. देशपातळीवर व्यापारी बँकांचे सदर प्रमाण ४६ टक्के   आहे, तर सहकारी बँकांचे ६४ टक्के आहे. राज्य बँकेने मात्र प्रथमच अनुत्पादक कर्जासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केल्याने, निव्वळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण ० टक्के झाले आहे.

बँकेने आपले व्यवहार फक्त जिल्हा बँका अथवा साखर कारखान्यांपुरते मर्यादित न ठेवता, राज्यातील सर्व जिल्हा बँका, नागरी बँका, पतसंस्था, हाऊसिंग सोसायटया व इतर सर्व सहकारी संस्थांच्या बाबतीत राबविलेल्या अनेक योजनांमुळे बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावल्याचेही अनास्कर यांनी या वेळी सांगितले. राज्य बँकेने, राज्यातील नागरी सहकारी बँकांना सरकारी कर्जरोख्यांची खरेदी/ विक्री करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. तसेच आरटीजीएस/ एनईएफटी या व्यवहारांसाठी थेट पोर्टल, सीटीएस क्लिअरिंगसारख्या अनेक सुविधा राज्य बँकेने सहकारी बँकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 2:03 am

Web Title: state co operative bank makes a profit of rs 325 crore akp 94
Next Stories
1 ‘ते’ पत्र खरंच परमबीर सिंग यांनी लिहिलेलं? मुख्यमंत्री कार्यालय करणार शहानिशा!
2 Parambir Singh Letter : गृहमंत्र्यांवरील आरोपांच्या पुराव्यादाखल परमबीर सिंग यांनी पत्रात दिले एसीपींचे ‘हे’ मेसेज!
3 Parambir Singh Letter : “मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातही गृहमंत्र्यांनी दबाव टाकला”, परमबीर सिंग यांचा आरोप!
Just Now!
X