News Flash

दरडोई उत्पन्नात घट; कर्जाचा बोजा पाच लाख कोटींवर

राज्याचे दरडोई उत्पन्न २०१९-२० या वर्षांत २ लाख, ०२ हजार कोटी होते

(संग्रहित छायाचित्र)

२०१९-२० च्या तुलनेत चालू आर्थिक वर्षांत राज्याचे दरडोई उत्पन्न घटले असून, कर्जाचा बोजा पाच लाख कोटींवर गेला आहे. यंदा राज्याच्या उत्पन्नात दीड लाख कोटींची तूट अपेक्षित धरण्यात आली आहे.

राज्याचे दरडोई उत्पन्न २०१९-२० या वर्षांत २ लाख, ०२ हजार कोटी होते. यंदा हे उत्पन्न १ लाख ८८ हजार कोटींपर्यंत घटले आहे. राज्याच्या दरडोई उत्पन्नात १३ हजार कोटींहून अधिक घट झाली आहे. २०१८-१९ मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न हे १ लाख ८७ हजार कोटी होते.

चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात महसुली जमा ३ लाख ४७ हजार कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले होते. पण करोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे सुधारित उत्पन्न ३ लाख ०९ हजार कोटी एवढे कमी करण्यात आले. डिसेंबरअखेपर्यंत उद्दिष्टाच्या ५० टक्केच उत्पन्न जमा झाले.

करोना परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडला. महसुली उत्पन्न घटल्याने खुल्या बाजारातून अल्प मुदतीचे कर्ज काढावे लागले. चालू आर्थिक वर्षांच्या अखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा ५ लाख २० हजार कोटींवर गेला. कर्जाचे प्रमाण हे राज्याच्या सकल उत्पन्नाच्या तुलनेत १९.६ टक्के आहे. हे प्रमाण २५ टक्क्यांच्या आत असावे, असे प्रमाण असून, तुलनेत कर्ज बरेच कमी आहे.

गुंतवणूक, रोजगार, वेतनखर्च

* मॅग्नेटिक महाराष्ट्र – २ या अंतर्गत राज्यात १ लाख १४ हजार कोटींची गुंतवणूक, अडीच लाख रोजगारनिर्मिती

* एप्रिल ते सप्टेंबर २०२० या काळात राज्यात ८ लाख १८ हजार कोटींची विदेशी गुंतवणूक. देशातील एकू ण विदेशी गुंतवणुकीपैकी राज्यात २७ टक्के गुंतवणूक

* वेतन, निवृत्ती वेतनावरील खर्च ५३ टक्के. गतवर्षांच्या तुलनेत खर्च ७ टक्क्यांनी वाढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:12 am

Web Title: state decline in per capita income abn 97
Next Stories
1 चांगल्या पावसाने कृषी क्षेत्राला आधार
2 सर्वच क्षेत्रांत निराशा
3 ‘करोना’विरोधात यंत्रणा तोकडी
Just Now!
X